नाशिक : कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून ‘डिजिलॉकर’ वापरा… | पुढारी

नाशिक : कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून ‘डिजिलॉकर’ वापरा...

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो 

दागिने चोरीला जाऊ नये म्हणून ज्याप्रकारे बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्याचप्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असणारी कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून सुरक्षित लॉकरमध्ये ठेवता येतात.

केंद्र सरकारने डिजिटल इंडियांतर्गत ‘डिजिलॉकर’ ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या लॉकरमध्ये दहावी, बारावी, पदवी यांचे मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड यासारखी महत्त्वाची असणारी सर्व कागदपत्रे डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येतात. डिजिलॉकर हे वापरकर्त्यांमध्ये वर्षानुवर्षे फार लोकप्रिय असले, तरी आजही डिजिलॉकर या सुविधेविषयी अनेकांना माहीत नाही, त्याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊ या डिजिलॉकर म्हणजे काय? ‘डिजिलॉकर’ ही भारत सरकारची मान्यताप्राप्त वेबसाइट आणि प्लिकेशन आहे. या दोन्हींचा वापर कुणीही करू शकतो. ही एक ऑनलाइन सुविधा आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयामार्फत पुरवली जाते. वेबसाइटवरून कागदपत्रे डाउनलोड करता येतात किंवा स्कॅन करून अपलोड करता येतात. डिजिटल ई-साइन सेवेचा उपयोग करून त्यावर स्वाक्षरी करता येते. या डिजिटल कागदपत्रांचा स्वीकार शासन व इतर संस्थादेखील करतात. तसेच केवायसीसाठीही त्याचा वापर केला जातो. आता मुलाखत, अ‍ॅडमिशन किंवा प्रवास करताना आयत्यावेळी महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगावी लागतात. ती जवळ नसली, तर पंचाईत होते शिवाय कामेही अडतात. आता कागदपत्रे सोबत नसली, तरी मोबाइल तर कायम सर्वांच्या जवळ असतो. डिजिलॉकर मोबाइल प्लिकेशनच्या माध्यमातून कागदपत्रांची लिंक शेअर करता येते, ती कागदपत्रे महत्त्वाच्या ठिकाणी दाखवता येतात.

डिजिलॉकर कसे सुरू करावे? : digilocker.gov.in ही सरकारची अधिकृत वेबसाइट आहे किंवा अ‍ॅप डाउनलोड करता येते. आधारकार्ड, ई-मेल आयडी पासवर्ड सेट करून अकाउंट तयार करता येते. आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी आल्यावर व्हेरिफाय झाल्यानंतर अकाउंट सुरू होते. त्यानंतर नव्याने यूझर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करता येते. त्यामध्ये दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेता येतो. याठिकाणी सरकारच्या सर्व अधिकृत वेबसाइटची माहिती मिळते. डिजिलॉकरमध्ये प्रत्येक वापरकर्त्याला 1 जीबी क्लाउड स्पेस मिळते. (म्हणजे कागदपत्रे साठवण्याची क्षमता) प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या वैयक्तिक फाइलवर त्याची 10 एमबीच्या वरती मर्यादा आहे. सध्याच्या घडीला भारतातील 5 करोडहून अधिक लोक या डिजिलॉकरचा वापर करत आहेत. थोडक्यात बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रकारे दागिने सुरक्षित राहतात त्याचप्रमाणे डिजिलॉकरमधील कागदपत्रे सुरक्षित राहतील.

हेही वाचा:

Back to top button
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती हॉट शालिनीनं जंगलात लावली आग… हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा किलर अवतार! हॉट पूजा गौरचे साडीतील सोज्वळ रूप पाहिले का ? (web story) हॉट दिशा पटानीची व्हायरल किक (Video) हॉट क्रितीचा ऑरेंज फ्लोलर रफलमध्ये भन्नाट देशी लूक हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा हेमांगी कवी – ये Pool राणी, असचं तुझ्यासारखं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे हे काय! झगा मगा मला बघा