पिंपरी : जलतरण तलावांवर पोहण्यासाठी गर्दी | पुढारी

पिंपरी : जलतरण तलावांवर पोहण्यासाठी गर्दी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या कांही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे; तसेच बहुतेक सर्व शाळांच्या परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या लागल्याने शहरातील जलतरण तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. पिंपरी- चिंचवड शहराचे तापमान जवळपास 38 ते 40 अंशावर जावून पोहचले आहे. दररोज तापमानामध्ये चड – उतार होत आहे.

शनिवारी (दि. 15) शहरामध्ये 40 अंश तापमानाची नोंद झाली. दिवसभर उकाड्यामुळे हैराण नागरिक दुपारी पोहण्याचा आनंद घेऊन थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शाळांना सुट्या लागल्यामुळे मुलांची मोठ्या प्रमाणात पोहण्यासाठी गर्दी होत आहे.
शहरात पालिकेचे एकूण 12 जलतरण तलाव आहेत. त्यातील 10 तलाव देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहेत.

हे तलाव लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे शहरातील दोन तलावांवर गर्दी वाढत आहे. दुसर्‍या ठिकाणी खासगी वॉटर पार्कमध्येदेखील गर्दी वाढत आहे. यामध्ये पोहण्याबरोबरच वेगवेगळे गेम्स असल्याने नागरिकांची पावले सहकुटुंब सहलीचा आनंद घेताना दिसत आहे.

Back to top button