नागपूर : आरटीई प्रवेश अर्जासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ !

नागपूर : आरटीई प्रवेश अर्जासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी शेवटचा दिवस असूनही नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून केवळ ८२२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. गरीब,वंचित घटकातील विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर या माध्यमातून प्रवेश देण्यात येतात. यामध्ये विविध माध्यमांच्या आणि विविध व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश असतो. १६ एप्रिलपासून आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी सुरुवात झाली. १६ ते ३० एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.

नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये ११८ शाळांमध्ये यातून प्रवेश करण्यात येत आहेत. या सर्व शाळांमधील ८४,९३० जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या असताना सोमवारपर्यंत (दि.२९) केवळ दोन ८२२८ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहेत.

पहिल्या टप्प्यात फारच कमी नोंदणी झाल्याने या प्रक्रियेला गुरूवारी (दि.२) मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे. सर्वाधिक सहा हजार पाचशे साठ अर्ज नागपूर जिल्ह्यात तर सर्वात कमी ८३ अर्ज दुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त झाले. नागपूर विभागाचा विचार करता भंडारा जिल्ह्यात ९५५ शाळा असून ११,९८५ जागा आहेत. अर्ज ३३८, चंद्रपूरला ८४६ शाळा १४७६० जागा तर ३०६ अर्ज , गडचिरोलीत १५७४ शाळा १२,८६५ जागा ८३ अर्ज, गोंदिया १२२५ शाळा १,४३३८ जागा ४७८ अर्ज, वर्धा १११८ शाळा ९४५२ जागा तर ४६३ अर्ज आणि नागपूर जिल्ह्यात २६१८ शाळा २१,७१० जागा तर ६,५६० अर्ज आतापर्यंत आले आहेत. आता १० मे पर्यंत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी याविषयीचे आदेश काढले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news