Lion hunting : शिकारीसाठी आलेल्या सिंहाना जिगरबाज बैलाने दाखवला ‘बाहेरचा रस्ता’ | पुढारी

Lion hunting : शिकारीसाठी आलेल्या सिंहाना जिगरबाज बैलाने दाखवला ‘बाहेरचा रस्ता’

जुनागढ, पुढारी ऑनलाइन:  सिंह समोर आला की भल्याभल्यांना घाम फुटतो (Lion hunting ).  भुकेल्या सिंहासमोर जर एखादे जनावर असेल तर क्षणात फडशा पाडण्यासाठी सिंह झेप घेतो; पण कधी कधी शिकार करण्यास आलेल्या सिंहाला समोरच्या जनावरच्या हिंमतीसमोर माघार घ्यावी लागते. झाले असे की, गुजरातमधील जुनागढमध्ये दोन सिंह शिरले. त्यांनी एका बैलाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाने या दोन्ही सिंहांना पळवून लावले.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

जुनागढ येथील हडमतिया येथील गावात रात्री दोन सिंह रहिवाशी भागात घुसले. ते एका गल्लीतून पुढे गेले असता एका चौकात बैल उभा होता. हा एकटा बैल रवंथ करत होता. दोनपैकी एका सिंहाने त्याच्या जवळ जात हाती आलेली आयती शिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र, बैलाने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या सिंहाने त्याला घेरण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यालाही त्याने शिंगे उगारत आपला बाणा दाखवला. त्यावेळी सिंहाच्या लक्षात आले की बैलांची शिकार करणे फारसे सोपे नाही.

Tiger hunting : आल्यापावली परत

दोन सिंहानी काही वेळ शिकार करण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, त्यांना यश आले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे सिंहा एका गल्लीतून येत असताना त्यांना बैल दिसला. बैलाजवळ जाताच त्यांनी त्याला घेरून शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मनसुबे जिगरबाज बैलाने उधळून लावले. त्यामुळे दोघाही सिंंहाना आल्या पावली पुढे जावे लागले. या गावात वारंवार सिंह येतात. वास्तविक सिंह गावात येण्याची ही पहिली घटना नाही. या गावाच्या भोवती जंगली परिसर असल्याने शिकारीसाठी हे सिंह रहिवाशी क्षेत्रात येतात. अनेक पाळीव प्राणी या वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहेत. मात्र, त्या रात्री बैलाने सिंहांना दाद लागू दिली नाही.

हेही वाचा : 

 

 

Back to top button