व्हायरल व्हिडिओ : मानवतेला लाज आणली! मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाला उलटे टांगून मारले

व्हायरल व्हिडिओ : मानवतेला लाज आणली! मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाला उलटे टांगून मारले
Published on
Updated on

मंगळूर; पुढारी ऑनलाईन डेस्क

कर्नाटकातील मानवतेला लाज आणणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला उलटे टांगून मारण्यात आले आहे. या प्रकरणी मंगळूर दक्षिण पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. ही घटना मंगळूर ओल्ड पोर्ट येथील आहे. एका कामगाराला मासेमारी बोटीत उलटे टांगून त्याचा छळ केला जात असल्याचे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सदर कामगार आपली सुटका करुन घेण्यासाठी धडपडत आहे. पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती त्याचा छळ करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

या प्रकरणी शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितले की, पीडीत व्यक्ती हा ३४ वर्षीय आहे. तर या प्रकरणातील संशयित आंध्र प्रदेशातील कामगार आहेत. पीडित व्यक्तीचे नाव शीनू असे आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या १४३,१४७, १४८, ३२३, ३२४ आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

मोबाईल फोन चोरल्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news