पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीयांचे क्रिकेटवरील प्रेम हे शब्दांच्या पलिकडचं. टीम इंडिया देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्रिकेट खेळत असल्यास चाहते तिथे पोहोचतातच. खेळाडूंचा उत्साह वाढवत सामन्याचा आनंद लुटतात. सध्या भारतीय खेळाडूंना सामने खेळण्यासाठी भरमसाठ मानधन मिळते; पण तुम्हाला माहीत आहे का, 1983 च्या वर्ल्ड कप दरम्यान भारतीय खेळाडूंचा पगार किती होता? आज 1983 च्या विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंच्या पगाराचे रहस्य उलगडून दाखवूया, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.
वर्ष 1983 आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान. जिथे भारतीय संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या सामन्याने 24 वर्षीय भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांना रातोरात स्टार बनवले; पण काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये 1983 विश्वचषक (83 World Cup) स्पर्धेतील क्रिकेटपटूंना किती पगार मिळाला याची माहिती होती.
मकरंद वायंगणकर नावाच्या युजरने ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता. ते पत्रकार आहेत. त्यांनी शेअर केलेला तो एक खूप जुन्या कागदाचा फोटो आहे; पण त्याच ऐतिहासिक महत्त्व त्यावरील मजकूर वाचल्यानंतरच कळतं. या कागदावर 1983 च्या विश्वचषक (83 World Cup) स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा पगार लिहिला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजानेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर '1983 विश्वचषक' विजेत्या भारतीय संघाची ती ऐतिहासिक पे स्लिप शेअर केली. यादरम्यान त्यांनी लिहिले की, मला अजूनही आठवते की, आम्ही 1986-87 मध्ये भारतीय दौऱ्यावर होतो तेव्हा आम्ही 5 कसोटी आणि 6 वनडे खेळलो होतो. या दरम्यान मला 55,000 रुपये मिळाले.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा जास्त पैसे मिळत असत, पण आज दोन्ही संघांना मिळणाऱ्या फीमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. 1983 साली जेव्हा भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला. यावेळी भारतीय संघ हा संघ विश्वचषक जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते; पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील या युवा संघाने क्रिकेट विश्लेषकांचा अंदाज चुकवत विश्वचषक आपल्या नावावर केला.
दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'विश्वचषक' विजेत्या 'टीम इंडिया'चे भव्य स्वागत केले होते. कपिल देव यांच्या विश्वविजेत्या सेनेचे देशाच्या कानाकोपऱ्यात कौतुक होत होते. यादरम्यान संघातील सर्व खेळाडूंना अनेक सन्मानही मिळाले होते. बीसीसीआयने खेळाडूंना बक्षीस म्हणून भरपूर पैसेही दिले होते.
खरेतर, जगज्जेत्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंना 21 ऑगस्ट 1983 रोजी त्यांचा रोजचा पगारही देण्यात आला होता. आज आम्ही तुम्हाला तीच सॅलरी स्लिप दाखवणार आहोत. ही 'पगार स्लिप' काळजीपूर्वक पहा. यामध्ये 'वर्ल्ड कप' खेळलेल्या 14 भारतीय खेळाडूंची नावे आहेत. यावरून या काळात खेळाडूंना 1500 आणि 600 रुपये प्रतिदिन भत्त्यासह एकूण 2100 रुपये देण्यात आल्याचे स्पष्ट होते.
आज बीसीसीआय आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनले आहे. आज भारतीय खेळाडूंना वर्षाला काेट्यवधी रुपये दिले जातात. बोर्डाच्या केंद्रीय करारानुसार, 'A+ ग्रेड' असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. या प्रकारात 3 खेळाडू आहेत: विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
त्याचप्रमाणे अ श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये, बी श्रेणीच्या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि क श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 1 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते.
IPL ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतील रोहित शर्माच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. या लीगमधून त्याने आतापर्यंत 146.6 कोटी रुपये कमावले आहेत. तर चेन्नई सुपर किग्जचा कर्णधार एमएस धोनीनंतर 'हिटमॅन' रोहित शर्मा 'IPL T20 टूर्नामेंट'मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. यलो आर्मी CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा IPL मधून 150 कोटींहून अधिक कमाई करणारा एकमेव खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)चा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 143 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचलं का?