‘पीई’ लीक प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीचे विशेष न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
सीबीआयचा प्राथमिक चौकशी रिपोर्ट अर्थात पीई लीक झाल्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, असे आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी सीबीआयला दिले. पीई रिपोर्टमध्ये कथितरित्या देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली होती.
सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव नसले तरी व्यापक विचार करता, देशमुख यांना लाभ होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे पीई लीक प्रकरणात त्यांचा सहभाग आहे की नाही, याची चौकशी करावी, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजीव अगरवाल यांनी केली.
सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी याप्रकरणात देशमुख यांचे वकील आनंद डागा, सोशल मीडियाचे कामकाज पाहणारा वैभव तुमाने यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे. डागा आणि तुमाने हे देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे 'पीई लीक' प्रकरण हा एका व्यापक कटाचा भाग असू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
हेही वाचलं का?

