बाहुबलीने शेअर केला ‘सरसेनापती हंबीरराव’चा टीझर! | पुढारी

बाहुबलीने शेअर केला 'सरसेनापती हंबीरराव'चा टीझर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रव[ण तरडे याचा बहुप्रतिक्षित असणारा ‘सरसेनापती हंबीरराव’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या टीझरची चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याने ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचं कौतुक प्रभासने केले आहे. त्याने फेसबुकवरती टीझरची पोस्ट शेअर केली आहे. ”टीझर आवडला! सर्वाधिक बजेट असलेल्या ऐतिहासिक मराठी चित्रपट #सरसेनापतीहंबीरराव प्रवीण विठ्ठल तरडे ला माझ्या हार्दिक शुभेच्छा.” अस प्रभासनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रभासने ही पोस्ट त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन शेअर केली आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे हे भव्य दिव्य असा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट घेवून आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हीने देखील या सिनेमाचा टीझर शेअर करत दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा ‘सरसेनापती हंबीरराव’ या बिगबजेट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button