दिल्लीतील अमृतमहोत्सवी संचलनासाठी कोल्हापूरच्या मावळा पथकाची निवड - पुढारी

दिल्लीतील अमृतमहोत्सवी संचलनासाठी कोल्हापूरच्या मावळा पथकाची निवड

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भारत देशाच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताकदिनानिमीत्त दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी (परेड) शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षीकांकरिता कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी पेठेतील ‘स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा’ मर्दानी आखाड्याची निवड करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या ‘वंदे भारतम’ स्पर्धेतून ही निवड करण्यात आली. स्वराज्य रक्षक मावळा संघात ओंकार पाटील, गणेश कदम, अभिनव मांगुरे, ऋषीकेश मुसळे, आदिती साळोखे, एकता सोळोखे, तेजस्वीनी अनगळ, सिध्देश जाधव, प्रथमेश पाटील, ओम मंडलिक, शिवम मंडलिक यांचा समावेश आहे. सर्वांना अतुल साळोखे, राजेश मंडलिक, प्राची मंडलिक, संदिप साळोखे, स्वरुपा साळोखे आदींचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा

Back to top button