शिवसेनेचे ४० आमदार सोबत; आणखी १० आमदार येणार : एकनाथ शिंदे | पुढारी

शिवसेनेचे ४० आमदार सोबत; आणखी १० आमदार येणार : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बंड करून सुरतवरून आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचं हिंदूत्व पुढे घेऊन जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेनेचे ४० आमदार सोबत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. दरम्‍यान आणखी १० आमदार आपल्‍यासोबत येणार असल्‍याची माहितीही त्‍यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल (दि.२१) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज (दि.२२) रोजी हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले. गुवाहाटी विमानतळाबाहेर त्‍यांच्यासाठीखास तीन बसेस तयार ठेवण्यात आल्या होत्या. तेथुन ते रॅडिसन हॅाटेलकडे रवाना झाले आहेत. सध्या या सर्व आमदारांना रॅडिसन हॉटेलमध्ये सुरक्षीत ठेवण्यात आले आहे.

यावेळी गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना गराडा घातला. तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा सवाल उपस्‍थित आहेत असा सवाल विचारला असता, शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्‍या सोबत असल्याचा दावा त्‍यांनी केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांचं हिंदूत्व पुढे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजुनही १० आमदार आपल्‍यासोबत येतील असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. यामुळे आणखी १० आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होणार असल्‍याचं दिसून येत आहे.

हे ही वाचलंत का? 

Back to top button