राजस्थान : भाजप नेते कैलाश मेघवाल यांना शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण | पुढारी

राजस्थान : भाजप नेते कैलाश मेघवाल यांना शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण

जयपूर; पुढारी ऑनलाईन : राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भाजप नेत्यांशी झटापट झाली. शेतकरी भाजपच्या निदर्शनाचा निषेध करत होते. दरम्यान, मुख्य बाजारात पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. अनेक शेतकरी यामध्ये जखमी झाले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राजस्थानमधील भाजप नेते कैलाश मेघवाल (bjp leader kailash meghval) यांना मारहाण केली.

भाजप नेते कैलाश मेघवाल (bjp leader kailash meghval) यांना संतप्त शेतकऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत पळवून पळवून मारल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळावरील वातावरण तणावपुर्ण बनले होते. यानंतर श्रीगंगानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

भाजप पदाधिकारी आणि शेतकरी यांच्यात जोरदार खडाजंगी

भाजप पदाधिकारी आणि शेतकरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडले. दरम्यान, मेघवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर पोलिस प्रशासनाने मेघवाल यांना शेतकऱ्यांच्या तावडीतून सोडवले.

महागाई आणि पाणी प्रश्नावर भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. यावेळी शेतकरी त्या ठिकाणी पोहोचले आणि तेथे जोरदार झटापट झाली. यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.

या घटनेचा भाजपकडून निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. श्रीगंगानगरमधील भाजपचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, असे असूनही पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. भाजप नेते कैलास मेघवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला होत होता. यावेळीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, मेघवाल यांच्यासोबत घडलेली घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे. हिंसाचाराला लोकशाहीत स्थान नाही.

याचबरोबर किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी आमदार अमराराम यांनी कोणाचेही नाव न घेता ट्विट करत म्हटले आही, जर तुम्ही शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह भाषा वापराल तर शेतकरी त्याचे स्वागत करणार नाहीत.

हे ही पाहा :

Back to top button