टोकियो ऑलिम्पिक : कमलप्रीत कौर अतिंम फेरीत, तिरंदाजीत निराशा | पुढारी

टोकियो ऑलिम्पिक : कमलप्रीत कौर अतिंम फेरीत, तिरंदाजीत निराशा

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कमलप्रीत कौर हिने भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहे.  कमलप्रीत कौर हिने ६४ मीटरवर थाळीफेक करून अंतिम स्पर्धेत स्थान मिळविले आहे.

तिरंदाजी स्पर्धेत अतानू दास याचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले.

भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी नऊ वाजता पात्रता फेरीच्या बी ग्रुपमधये कमलप्रीतने तिसऱ्या प्रयत्नात ६४ मीटरवर थाळीफेक केली.

या तिच्या गुणांकणामुळे ती दुसऱ्या स्थानी आली आहे. कमलप्रीतने नॅशनल रेकॉर्ड केले आहे.

कमलप्रीतबरोबर सीमा पुनिया हीसुद्धा या पात्रता फेरीत होती. तिने ६०. ५७ गुण मिळविले.

मात्र, तिला पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि थोडक्यात संधी हुकली.

कमलप्रीत कौर हिने पहिल्या प्रयत्नात ६०. २९ मीटर, दुसऱ्या स्थानी ६३. ९७ आणि शेवटच्या प्रयत्नात ६४ मीटरवर थाळीफेक केली.

ती आता भारताकडून अंतिम फेरीत खेळेल.

तिरंदाजीतील आव्हान संपुष्टात

भारताच्या अतानू दासला शुक्रवारी तिरंदाजी पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताकाहारू फुरुकुवाकडून ६-४ असा पराभव पत्करावा लागला.

या पराभवामुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे.

अतानूच्या पराभवामुळे भारताचा तिरंदाजी खेळप्रकार स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अतानूची पत्नी दीपिका कुमारीचा शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या एन सॅनकडून ६-० असा पराभव झाला होता.

खेळांच्या सुरुवातीला वैयक्तिक रँकिंग फेरीच्या आधारे ३५ व्या क्रमांकावर असलेल्या अतानूने ४६ व्या मानांकित फुरुकावाविरुद्ध खराब सुरुवात केली.

हेही वाचा: 

पहा व्हिडिओ: फुकट बिर्याणी महागात

Back to top button