KKR vs MI : कमिन्सचे वादळ; केकेआर विजयी

KKR vs MI : कमिन्सचे वादळ; केकेआर विजयी
Published on
Updated on

पुणे ; वृत्तसंस्था : अष्टपैलू पॅट कमिन्सचे (नाबाद 56) पुण्यात वादळ घोंगावले. त्याने अवघ्या 14 चेंडूत आयपीएलमधील दुसर्‍या वेगवान अर्धशतकाची नोंद करत केकेआरला (KKR vs MI) मुंबई इंडियन्सवर अद्याप 24 चेंडून बाकी असताना 5 विकेटने विजय मिळवून दिला. सलामीवीर वेंकटेश अय्यरनही नाबाद अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईला मात्र सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवची (52) खेळी मात्र व्यर्थ ठरली.

विजयासाठी 162 धावांचे टार्गेट असताना केकेआरने 16 षटकांत 5 विकेटस् गमावून 162 धावा काढत विजय मिळविला. वेंकटेश अयर व अजिंक्य रहाणे यांनी केकआरच्या डावास संथ सुरुवात करताना 16 धावांची सलामी दिली. मात्र टायमल मिल्सने केकेआरला पहिला धक्‍का देताना रहाणेला (7) झेलबाद केले. त्यानंतर वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर जोडी केकेआरला सावरणार असे वाटत असतानाच सॅम्सला चौकार खेचण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयसने (10) तिलक वर्माकडे झेल दिला. केकेआर 2 बाद 35.

वेंकटेश अयर व सॅम बिलिंग्ज यांनी आठव्या षटकात केकेआरचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, बिलिंग्जला 17 धावांवर एम. अश्‍विनने झेलबाद करत मोठा अडसर दूर केला. भरवशाचा फलंदाज नितीश राणाही अवघ्या 8 धावांवर परतला. तर धोकादायक रसेल (11) बाद झाला. (KKR vs MI)

एका बाजूने आक्रमक फलंदाजी करणार्‍या वेंकटेश अय्यरने आपले अर्धशतक 41 चेंडूंत 6 चौकार व एक षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. याचवेळी पॅट कमिन्सने डॅनिएल सॅम्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवून त्याच्या एकाच षटकात 35 धावा कुटल्या. याबरोबरच त्याने अवघ्या 14 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने के. एल. राहुल (14 चेंडूंत अर्धशतक) वेगवान अर्धशतकाची बरोबरी करत केकेआरच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. शेवटी कमिन्स 56 तर वेंकटेश अयर 50 धावांवर नाबाद राहिले. मुंबईच्या वतीने टायमल मिल्स व एम. आश्‍विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 161 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन व डेवॉल्ड ब्रेविस यांनी संथ फलंदाजी करत संघाला 45 धावांपर्यंत पोहोचवले. याचवेळी ब्रेविसला (29) वरुणने बाद केले. इशान किशनला (14) पॅट कमिन्सने बाद केले. (KKR vs MI)

सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी 34 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तर सूर्यकुमारने आपले अर्धशतक 34 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याने तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 52 धावांवर बाद झाला. दुसर्‍या बाजूने तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा काढल्या. शेवटच्या षटकात पोलार्डने 3 षटकार खेचत 5 चेंडूंत नाबाद 22 धावा काढल्याने मुंबईने 20 षटकांत 4 बाद 161 धावांपर्यंत मजल मारली. केकेआरच्या वतीने कमिन्सने 2 तर उमेश यादव व चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

आयपीएलमधील वेगवान अर्धशतकाशी बरोबरी

पॅट कमिन्सने आयपीएलमधील के. राहुल याच्या वेगवान अर्धशतकाशी बरोबरी साधताना मुंबईविरुद्ध अवघ्या 14 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 2018 मध्ये पंजाबकडून खेळताना दिल्लीविरुद्ध 14 चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावले होते. टी-20 मधील वेगवान अर्धशतक युवराजने झळकावले आहे. त्याने 2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या ख्रिस ब्रॉडला सलग सहा षटकार खेचत अवघ्या 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news