देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौरा : पूरग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी | पुढारी

देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौरा : पूरग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौरा करताना पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अधिक वाचा – 

पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आधीच राज्य सरकारकडून उशीर झालाय. आता सरकारने तातडीने मदत द्यावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केले.

अधिक वाचा –

ते म्हणाले, कोल्हापुरातील शाहुपुरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांच्याशी भेट झाली.

मी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि नंतर चंद्रकांत पाटीलदेखील आम्ही तिघांनी मिळून ३ दिवस दौरे केले. सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

एकूण २२ ठिकाणी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. ज्या ठिकाणी दरड कोसळली, पाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये शिरले, भूसंख्लन झाले. अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली.

सांगली आणि कोल्हापूरचे विश्लेषण करायचं झालं तर, कोल्हापूरचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.

२००५ ला मोठा महापूर आपण पाहिला. एकूण सरासरीच्या १५९ टक्के जास्त पाऊस झाला. २१ दिवस हा पाऊस पडला. २०१९ मध्ये ४८० टक्के जास्त पाऊस झाला.

२०२१ मध्ये ४५० टक्के अधिक पाऊस झाला. अलमट्टी आणि कोयनेतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणी का साचलं? याकडे अतिशय गांभीर्याने पाहावं लागेल.

अधिक वाचा- 

३९६ गावे पुराने बाधित आहेत. ६० हजार पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. घरे, शाळा, इमारती, दुकानांचं नुकसान झालं आहे.

जी काही तातडीची मदत राज्य सरकारच्या वतीने द्यायला पाहिजे होतं, ती अद्याप देण्यात आलेली नाही. २०१९ ला वेगवेगळ्या प्रकारे जी मदत झाली, त्याचा उल्लेख लोक करत होते.

सरकारने तातडीची मदत द्यावी

सामान्यांच्या वेदना आम्ही या दौऱ्यातून जाणून घेतल्या. राज्याकडून अजुनही पूरग्रस्तांना मदत नाही. सरकारने तातडीची मदत करावी. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मदत मिळावी.

जे व्यापारी कोरोनामुळे अडचणीत होते. आता पुरामुळे त्यांचा माल खराब झाला. पाणी शिरल्यामुळे घरातील मीटर खराब झाले आहेत. महावितरणकडून मीटर मोफत मिळावं.

शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. अनावश्यक माती शेतात आली आहे. ती स्वच्छ करावी लागेल.

कुंभार लोक मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. ७ हजार गणेश मूर्ती खराब झाल्या आहे. आपण आधी त्यांना मदत केली होती. आता राज्य सरकारने त्यांना विशेष मदत केली पाहिजे.

कोल्हापुरात बॉक्स ब्रीजसाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला होता. बॉक्स ब्रीजची संकल्पना केंद्र सरकारने मनावर घेतली पाहिजे.
कुठे पाणी मुरंत, कुठे साठतं हे पाहिलं.

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २२ छोट्या-मोठ्या पुलांचा आराखडा तयार करण्यात आला होता. तो आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे.

चंद्रकांत पाटील, अंमल महाडिक यांनी मिळून तो आराखडा तयार केला होता. त्या आराखड्याची अंमलबजावणी करायला हवी.

पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासंदर्भात विचार सुरू होता. केंद्र सरकारच्या विभागाची आम्ही मदत घेतली होती. हे पाणी दुष्काळी भागात कसे वळवता येईल, यासंदर्बातचा अहवाल वर्ल्ड बँकेला सादर केला होता. वर्ल्ड बँकेच्या टीमसोबत आम्ही चर्चा केला होती, त्यास मान्यता मिळाली होती.

अधिक वाचा- 

पाहा व्हिडिओ – डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

 

Back to top button