ठाणे : घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; सहा घरांचे नुकसान | पुढारी

ठाणे : घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; सहा घरांचे नुकसान

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : कळवा घोलाईनगर येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून सहा घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा येथील पारधी पाडा, गणेश वेल्फेअर सोसायटी, घोलाईनगर, कळवा (पु), ठाणे येथे गगनगिरी चाळीमध्ये गुरुवारी संध्याकाळी ४.३५ वाजेच्या सुमारस २-गॅस सिलिंडरचा स्फोट आणि १ गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी त्यांच्या सोबत कळवा पोलीस, वन विभागाचे कर्मचारी, टोरेंट विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान १-फायर इंजिन, १-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणलाही दुखापत नाही. तर, गगनगिरी चाळीतील या सहा झोपडपट्टी खोल्यांचे पूर्ण नुकसान झाले असून राम उजागीर मोरया,  रघुनदन मोरया, हरिश्चंद्र कनोज्या, राजेंद्र बुरुड, कालू गुप्ता, राहुल गुप्ता, अशी नुकसान झालेल्या घरमलकांची नावे असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हे वाचलंत का? 

Back to top button