पुणे : वरकुटे बुद्रुक येथे अफुची शेती; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : वरकुटे बुद्रुक येथे अफुची शेती; दोघांवर गुन्हा दाखल

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक याठिकाणी अफु या अंमली पदार्थाची काही झाडे आंतरपिक पद्धतीने लागवड करण्यात आली होती. इंदापूर पोलीसांनी या ठिकाणी कारवाई करत २ लाख ११ हजार ३०० रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सुरेंद्र जंयवत वाघ यांच्या फिर्यादीवरुन पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे (दोघे रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापुर) यांच्याविरूद्ध अंमली औषधिद्रव्य व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी : युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्‍यासाठी रशिया चर्चेस तयार

बुधवारी (दि. २) पांडुरंग नामदेव कुंभार (रा. वरकुटे बुद्रुक) यांचे जमीन गट नंबर 24 व नवनाथ गणपत शिंदे यांचे गट नं.२८/२ मधील शेतातील विहीरीच्या कडेला ही अफुची झाडे भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपिक म्हणून लागवड केल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. अफुचे (खसखस) ओल्या झाडाचे व बोंडाचे एकुण वजन 32 किलोग्रॅम असून, अफुच्या बोंडासह झाडांची एकुण किंमत अंदाजे 2 लाख 11 हजार 300 रूपये आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत.

हे वाचलत का?

जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र लावणे बंधनकारक

Murder : कचरा टाकल्याच्या कारणावरून नांदेडात दोन सख्ख्या भावांचा खून

Winter Paralympics 2022 : आता रशिया सोबत बेलारुसला दणका, बिजिंग पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंवर घातली बंदी

Back to top button