Amitabh Bachchan : अमिताभ यांनी ‘झुंड’ च्या प्रदर्शनापूर्वी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन | पुढारी

Amitabh Bachchan : अमिताभ यांनी ‘झुंड’ च्या प्रदर्शनापूर्वी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी गुरुवारी (दि. ३) श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. अभिनेते व पुत्र अभिषेक बच्चनही (abhishek bachchan) त्यांच्या सोबत होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूर्जा केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजाराम देशमुख यांनी बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला.

अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट उद्या ४ तारखेला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (nagraj manjule) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ह्या चित्रपटाबद्दल चित्रपटरसिकांच्या व अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

झुंड चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली व बाप्पाचे आशिर्वाद घेतले. मंदिर समितीच्या वतीने राजाराम देशमुख यांनी बच्चन यांचा बाप्पाची शाल व मूर्ती भेट दिली व झुंड चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

झुंड चित्रपटाद्वारे दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रथमच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे, जो त्यांनी दिग्दर्शित केला आहे. शिवाय त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन हे काम करत आहेत. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासह अमिताभ बच्चन व तमाम सिनेरसिकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. नागराज मंजुळे यांच्या सैराट या मराठी चित्रपटाने इतिहास घडवला होता. या मराठी प्रादेशिक चित्रपटास महाराष्ट्राबाहेर देखिल कौतुक झाले होते. शिवाय त्याच्या सैराट सिनेमाचा रिमेक बॉलिवूडमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

अधीक वाचा : 

Back to top button