सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रँव्हल्सला लागली आग | पुढारी

सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रँव्हल्सला लागली आग

तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम झाल्यामुळे टायर फुटून ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. ही घटना आज ( दि. १८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने  कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी सातारा बाजूकडून तासवडे टोल नाका परिसरात आली. ट्रॅव्हल्समधून सुमारे ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचे साहित्य व अन्य साहित्यही यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम होऊन टायर अचानक फुटला. त्यानंतर काही समजण्यापूर्वीच ट्रॅव्हल्सने पेट घेतला.

सुदैवाने आग डिझेल टाकीपर्यंत जाण्यापूर्वीच विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र तळबीड पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button