Distance in children and parents : चौदाव्या वर्षानंतर मुलांचा पालकांशी वाढतो दुरावा | पुढारी

Distance in children and parents : चौदाव्या वर्षानंतर मुलांचा पालकांशी वाढतो दुरावा

वॉशिंग्टन : ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने अमेरिकेत एक संशोधन केले. त्यामधून असे दिसून आले की, 14 ते 22 वर्षांच्या 26 टक्के तरुण-तरुणींचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्या पालकांशी, विशेषतः वडिलांशी दुरावा निर्माण होतो. (Distance in children and parents) अर्थात, हा दुरावा अधिक काळ राहत नाही व बहुतेक वेळा मुलेच पुढाकार घेऊन हा दुरावा दूर करतात. मुलांच्या तुलनेत मुली वडिलांवर 22 टक्के अधिक वेळा रुसतात. आईबाबत मुलांच्या किंवा मुलींच्या बाबतीत हे प्रमाण केवळ 6 टक्के आहे.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधील समाजशास्त्राचे प्राध्यापक रिन रेकजेक यांनी सांगितले की, पौगंडावस्थेत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावरीलही बदल घडत असतात. (Distance in children and parents) मुले तारुण्यावस्थेत येत असताना त्यांच्या मनातही अनेक प्रकारचा भावनिक गोंधळ असतो. अशा गोंधळलेल्या स्थितीत निर्णय घेत असताना वडिलांशी ते सहमत होऊ शकत नाहीत.

त्यामुळे वडिलांशी दुरावा (Distance in children and parents) निर्माण होत असतो. संशोधनात आढळले की, मुलांनी वडिलांशी अंतर ठेवण्याचे सरासरी वय 23 वर्षे आहे. आईपासून अंतर ठेवण्याचे सरासरी वय 26 वर्षे आहे. विवाहित किंवा घटस्फोटित मुले-मुली आई-वडिलांपासून अधिक दूर जातात; मात्र ज्यावेळी त्यांना मुले होतात त्यावेळी त्यांचे विचार व द़ृष्टिकोन बदलतो. अशा वेळी ते आपल्या आई-वडिलांशी जवळीक वाढवू लागतात.

हेही वाचा :  

Back to top button