मूळचे भारतीय लिओ वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान | पुढारी

मूळचे भारतीय लिओ वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान

आयर्लंड : भारतीय मूळ असलेले लिओ वराडकर 30 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. ते दुसर्‍यांदा या देशाचे पंतप्रधान बनले आहेत.

2020 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी तीन पक्षांत युती झाली होती. दोन पक्षांचे नेते निम्म्या निम्म्या कालावधीसाठी पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळतील, असे युतीअंतर्गत ठरले होते. त्यानुसार फियाना फेल पक्षाचे मायकेल मार्टिन हे 16 डिसेंबर 2022 पर्यंत पंतप्रधानपदी होते. यानंतर फाइन गेल पक्षाचे लिओ वराडकर यांची वेळ आता आली आहे. विद्यार्थीदशेपासूनच लिओ राजकारणात आहेत. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.

Back to top button