Weather Forecast IND: ऐन थंडीत ‘या’ राज्यांवर पावसाचे ढग | पुढारी

Weather Forecast IND: ऐन थंडीत 'या' राज्यांवर पावसाचे ढग

पुढारी ऑनलाईन : देशाच्या उत्तर भागात थंडीने दार ठोठावले आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने घट होत आहे. येत्या काही दिवसांत विक्रमी थंडीचा सामना करावा लागू शकतो. त्याच वेळी काही राज्यांमध्‍ये थंडीच्या काळातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या १२ तासांत महाराष्ट्रासह, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओडिसात विजेच्या गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ( Weather Forecast IND )

यंदा ऐन हिवाळ्यात उन, पाऊस आणि थंडी अशी स्थिती पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्‍ये मंदोस चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात पाऊस सदृश्यस्थिती होती. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबावा पट्टा निर्माण झाला आहे. पुढचे सात ते आठ दिवस महाराष्ट्रसहीत मध्य भारतात कमाल तापमान हे चढेच राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ( Weather Forecast IND )

उत्तराखंड, राजस्थान आणि हिमाचलमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात १७ ते १८ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही तापमानाचा पारा खाली येऊन थंडी पसरू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे.

बिहारमध्ये थंडी गेल्या आठ वर्षांचा विक्रम मोडणार

बिहारमध्ये हिवाळ्यातील थंडी गेल्या आठ वर्षांचा विक्रम मोडू शकते. कटिहार, बेगुसराय, खगरिया, छपरा, बक्सर, आरा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये २५ डिसेंबरपासून विक्रमी थंडी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button