IPL 2024 GT vs RCB : विल जॅक्सचे वादळी शतक, विराटची धडाकेबाज खेळी; आरसीबीचा दिमाखदार विजय | पुढारी

IPL 2024 GT vs RCB : विल जॅक्सचे वादळी शतक, विराटची धडाकेबाज खेळी; आरसीबीचा दिमाखदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL)मध्‍ये आज गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ( RCB) आमने-सामने आहेत. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 20 षटकामध्‍ये गुजरातने 3 गडी गमावत 200 धावा केल्‍या आहेत. विजयासाठी बंगळूरसमोर 201 धावांचे लक्ष्‍य आहे.गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्सने शतकी खेळी केली. तर विराट काेहलीने धडाकेबाज 70 धावांच्‍या जाेरावर बंगळूरने 9 गडी राखत दिमाखदार विजय नाेंदवला.

विराट-जॅक्‍सची शतकी भागीदारी

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅकने विराट कोहलीसोबत शानदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. विल जॅक्‍सने राशिद खानच्या षटकात 29 धावा करत आरसीबीला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. जॅक्‍सचे  आयपीएलमधील पहिले शतकही झळकावले.  विल जॅक्‍स 100 तर विराट कोहली 70 धावांवर नाबाद राहिले.

विराटचे दमदार अर्धशतक

गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना  विराटने कोहली हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने सामन्यातील 10 व्या षटकामध्ये चौकार लगावत 32 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

गुजरातची फलंदाजी

सहा धावांवर गुजरातला पहिला धक्‍का

अवघ्या सहा धावांवर गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला. स्वप्नील सिंगने डावाच्या पहिल्याच षटकात ऋद्धिमान साहाला बाद केले. त्‍याने केवळ पाच धावा केल्‍या. ग्लेन मॅक्सवेलने गुजरातला दुसरा धक्का दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला बाद केले. तो 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात मॅक्सवेल पुनरागमन करत आहे.

शाहरुख-सुदर्शनने डाव सावरला

४५ धावांवर दोन विकेट गमावलेल्या गुजरातच्या डावाची धुरा शाहरुख खानने सांभाळली. त्‍याने साई सुदर्शनसोबत महत्त्वाची भागीदारी केली. 12 षटकांनंतर संघाची धावसंख्या शंभर पार करण्‍यात या दोघांची खेळी महत्त्‍वपूर्ण ठरली. शाहरुखने २४ चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले.

साई सुदर्शनची दमदार खेळी

सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी 69 धावांची नाबाद भागीदारी केली. सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. त्‍याने आठ चौकार आणि चार षटकार फटकावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने 19 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्‍या. आरसीबीतर्फे स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

Back to top button