सिंधुदुर्ग: मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची रविवारी यात्रा | पुढारी

सिंधुदुर्ग: मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची रविवारी यात्रा

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्रीदेव कोळंबाची जत्रा रविवारी (दि. ५ मे) आयोजित करण्यात आली आहे. मटण भाकरीचा प्रसादासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यात प्रसिद्ध असणा-या व भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी श्रीदेव कोळंबाची ख्याती आहे.

दरम्यान यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद म्हणून चक्क  मटण व भाकरीचा प्रसाद वाटप केला जातो. महाराष्ट्रात मटण भाकरीचा प्रसाद अशी ओळख असणा-या या जत्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तरी भाविकांनी या जत्रौत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button