sukesh chandrasekhar : मंत्री सत्येंद्र जैन, गेहलोतांना महाठग सुकेशने १२० कोटी दिल्याचे पुरावे! | पुढारी

sukesh chandrasekhar : मंत्री सत्येंद्र जैन, गेहलोतांना महाठग सुकेशने १२० कोटी दिल्याचे पुरावे!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ; दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंडोली कारागृहातील महाठग सुकेश चंद्रशेखर याने तिहार कारागृहात असलेले दिल्लीचे तुरुंगमंत्री सत्येंद्र जैन, दिल्लीचे महसूल मंत्री कैलाश गेहलोत आणि कारागृह महासंचालक संदीप गोयल यांच्यावर केलेले खंडणीचे आरोप खरे असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीच्या अहवालातून काढण्यात आला आहे. (sukesh chandrasekhar)

सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत यांच्याशी मोबाईल फोनवरून झालेल्या सुकेश चंद्रशेखरच्या चॅट आणि फोन कॉल्ससह व्यवहार झाला, त्यावेळेचे या सर्व मोबाईल फोन्सचे लोकेशन या आधारे सुकेशचा या सर्वांवरील खंडणीचा आरोप खरा असल्याचे समितीला आढळले आहे. सुकेशने जैन, गेहलोत, गोयल यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी त्याच्या चौकशीसाठी मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चाधिकार समिती नेमली होती. समितीने मंडोली कारागृहात सुकेशची दोनदा भेटही घेतली होती. केजरीवालांना पूर्ण कल्पना सुकेशच्या एकूण संभाषणातून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण कल्पना होती, हे स्पष्ट होते. ५० कोटी रुपये देऊन झाल्यावर २०१७ मध्ये सुकेशने हॉटेल हयातमध्ये पार्टी दिली होती. पार्टीला जैन आणि गेहलोत हजर होते.सुकेशच्या फोनसह चॅटस्, कॉल्स, लोकेशन आणि काही व्हिडीओ फुटेज तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. पैसे दिल्यानंतर सत्येंद्र जैन हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून बोलणे करून द्यायचे, असे सुकेशने चौकशी समितीच्या तपासात सांगितले आहे.

अहवालातील तपशील
• सुकेशने ‘आप’कडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी सत्येंद्र जैन यांना ६० कोटी रुपये दिले होते.
● दिल्लीचे परिवहन मंत्री गेहलोत यांच्या दिल्लीतील असोला माईन्स फार्म हाऊसवर चार टप्प्यांत हा व्यवहार झाला.
● सुकेशने तत्कालीन महासंचालक (तुरुंग) संदीप गोयल यांना १२.५० कोटी रुपये दिले होते.

sukesh chandrasekhar : तपास सीबीआयकडे?

प्रकरण एकूणच अत्यंत गंभीर असल्याचे समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाल्याने नायब राज्यपाल या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा

Back to top button