डेक्कन क्वीनला मिळणार नवे रंगीत डबे | पुढारी

डेक्कन क्वीनला मिळणार नवे रंगीत डबे

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या चाकरमान्यांची लाडकी डेक्कन क्वीन एक्सप्रेस आता लवकरच नव्या रूपात पहायला मिळणार आहे. डेक्कन क्वीनचे एलएचबी कोचचे डबे येत्या जानेवारी महिन्यात बदलण्याची शक्यता असून, हे डबे रंगीबेरंगी असणार आहेत.

डेक्कन क्वीनला यापूर्वी रेल्वे प्रशासनाने विस्टाडोम कोच बसविला आहे. त्याला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता रेल्वे प्रशासन डेक्कन क्वीन इंटरसिटी या रेल्वेचे डबेबदलण्याची शक्यता आहेे. डबे बदलण्याचा निर्णय येत्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता असून, नवे डबे बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा

पुणे : खराडी बनतंय ‘ग्लोबल स्टार्टअप हब’

पुणे महापालिकेत ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेच्या खेळात आता ’टेंडर सेल’ही!

मद्याची सर्रास होतेय जाहिरातबाजी!

‘७/१२’ ला एक लाख मोफत सात बारा वाटणार

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत परवानगी द्या’

पुण्यात काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षाचा भर दिवसा गोळ्या घालून खून

Back to top button