मद्याची सर्रास होतेय जाहिरातबाजी! | पुढारी

मद्याची सर्रास होतेय जाहिरातबाजी!

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही

पुणे : समीर सय्यद : मद्य हे शरीराला हानिकारक असल्याने त्याची जाहिरात करता येत नाही. परंतु, अनेक कंपन्यांकडून आपल्या सोशल मीडियावरील विविध माध्यमांचा वापर करून बिनदिक्कतपणे जाहिरातबाजी केली जात आहे. या जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्याही प्रकारची स्वतंत्र यंत्रणा नाही. याचाच फायदा कंपन्या घेत असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या उत्पादनाला मागणी वाढावी, यासाठी आकर्षक जाहिराती केल्या जातात. परंतु, मद्यांच्या उत्पादनांची जाहिरात करता येत नाही, ही बाब मद्यविक्री अथवा उत्पादनाचा परवाना देतानाच स्पष्ट केली जाते. 1995 सालापासून मद्य आणि सिगारेट्सच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली. मात्र, काही उत्पादक सोड्याच्या जाहिरातीच्या आडून मद्याची जाहिरात सोशल मीडियावर करीत आहेत. त्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते आणि इतर व्यक्तींचा वापर केला जातो.

Team India won : न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाची नव्या विक्रमाला गवसणी!

मद्य उत्पादनाची सोशल मीडियावरून जाहिरात केली जात आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत असतो. मात्र, अशा जाहिरातींना आळा घालण्यासाठी वेगळी यंत्रणा सध्यातरी त्यांच्याकडे नाही. पुणे शहरात वाईन शॉप, बिअर बार आणि अन्य मद्य विक्रेत्यांनी विविध मद्यांची जाहिरात असलेले फलक लावले होते. त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सर्व जाहिराती काढण्यात आल्या आहेत. मात्र, पुन्हा जाहिरातबाजी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना बसणार हवामान बदलाचा फटका

असा असावा फलक

मद्यालयांवरील मद्याच्या फ्लेक्समुळे मद्य पिण्याकडे अनेक जण आकर्षित होऊ शकतात. लहान मुलांवर, विद्यार्थ्यांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे कोणत्याही दुकानावर मद्याचे छायाचित्र व जाहिरातीचे फ्लेक्स लावू नयेत, असा नियम आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून फ्लेक्सबाजी केली जाते. केवळ परवानाधारकाचे नाव आणि परवाना क्रमांक एवढेच मद्यविक्री केंद्राच्या फलकावर असणे आवश्यक आहे.

ममतांचा उतावीळपणा

“मद्याची कोणत्याही प्रकारे जाहिरात करता येत नाही. काही जण सोशल मीडियाचा वापर करून जाहिरात करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यापुढेही जाहिरात करताना आढळल्यास कारवाई केली जाईल.”
                                                                                                           – कांतीलाल उमाप, आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग

हेही वाचा

कर्नाटक : नवोदय विद्यालयामधील ६३ विद्यार्थ्यांना कोरोना

केंद्रीय यंत्रणांकडून आमचा छळ : संजय राऊत

Pizza day : ‘गुगल डुडल’तर्फे अनोख्‍या पद्‍धतीने ‘पिझ्झा डे’ साजरा

अर्थज्ञान : आयकर रिटर्न भरताना होणार्‍या चुका कशा टाळायच्या? जाणून घ्या माहिती

 

Back to top button