NEET | नीटचा अर्ज भरताना चुकलात? घाबरु नका; अशी करता येणार दुरुस्ती | पुढारी

NEET | नीटचा अर्ज भरताना चुकलात? घाबरु नका; अशी करता येणार दुरुस्ती

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट 2024’ परीक्षेसाठी अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 18 ते 20 मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘नीट’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च होती. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज केले आहेत आणि अर्ज भरताना काही त्रुटी केल्या आहेत, त्यांच्यासाठी अर्जात दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी असेल.

अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/ NEET ला भेट द्यावी. यानंतर करेक्शन विंडो लिंकवर क्लिक करून लॉगिन करावे आणि ज्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्यानंतर दुरुस्ती शुल्क जमा करावे आणि अर्ज सबमिट करावा. शेवटी पूर्णपणे भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढावी. त्रुटी दुरुस्त करण्याबरोबरच त्यांनी शुल्क जमा करावे, अर्ज शुल्काशिवाय केलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. दरम्यान, ‘नीट यूजी’ परीक्षा 5 मे 2024 रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button