सीईटीशिवाय प्रवेश नाही; सीईटी सेलचे निर्देश | पुढारी

सीईटीशिवाय प्रवेश नाही; सीईटी सेलचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत बी.बी.सी.ए./ बी.बी.ए./बी.एम.एस./बी.बी.एम. आदी अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना संबंधित सीईटीची तयारी करावी लागणार आहे. सीईटीशिवाय प्रवेश होणार नाही, असे सीईटी सेलकडून स्पष्ट केले आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या अ‍ॅप्रूव्हल प्रोसेस हँडबुकप्रमाणे बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ बी.एम.एस./बी.बी.एम. अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीत आणलेला आहे. तसेच, संबंधित अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे बी.बी.सी.ए./ बी.बी.ए./ बी.एम.एस./ बी.बी.एम. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

निकालाच्या आधारेच प्रवेश

प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या आधारेच प्रवेश होणार आहेत. परिणामी बी.बी.सी.ए./ बी.बी.ए. /बी.एम.एस./ बी.बी.एम. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सीईटी सेलमार्फत घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच, संबंधित परीक्षेचे वेळापत्रक व इतर माहितीसाठी उमेदवारांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर ुुु.ारहरलशीं.सळस भेट द्यावी, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button