दुर्दैैवी ! ट्रक्टर अंगावरून गेल्याने दहा वर्षांच्या मुलीचा करुण अंत | पुढारी

दुर्दैैवी ! ट्रक्टर अंगावरून गेल्याने दहा वर्षांच्या मुलीचा करुण अंत

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : दौंड-कुरकुंभ रस्त्यावर भरधाव वेगातील ऊस वाहतुकीचा ट्रक्टर अंगावरून गेल्याने एक दहा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. मृणाली संजय थोरात (वय १०, रा. एसआरपीएफ कॅम्प गट नंबर ५, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. सोमवारी (दि. १) रात्री साधारण नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृणालीचे चुलते संतोष थोरात दुचाकीवरून (एमएच ४२ एडी ४१९२) मृणालीला घेऊन आईसक्रीम आणण्यासाठी गेले होते. आईसक्रिम घेऊन पुन्हा घरीत जाण्यासाठी निघाले होते. यादरम्यान ऊसाने भरलेला दोन ट्राॅली असलेला ट्रॅक्टर (एमएच ४२वाय ४२२१) हा दौंड-कुरकुंभ रस्त्यावरून भरधाव वेगात निघाला होता. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्राॅली हालत होत्या. गट क्रमांक पाच येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिला. दुचाकीसह संतोष व मृणाली खाली पडले. मृणालीच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली.

हेही वाचा

Back to top button