थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवास १२ जानेवारीपासून | पुढारी

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवास १२ जानेवारीपासून

पुढारी ऑनलाईन डेस्क : २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. (third eye asian film festival ) महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील. (third eye asian film festival )

संबंधित बातम्या –

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २० व्या आवृत्तीत, आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे आणि इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

भारतीय चित्रपट विभागात मराठी, मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात फॅमिली, डीप फ्रीझ, बिजया पोरे, या गोष्टीला नावच नाही, आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड १३, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी या १२ चित्रपटांचा समावेश आहे.  मराठी स्पर्धा विभागात (दिग्दर्शक जयंत सोमाळकर), रघुवीर (दिग्दर्शक निलेश  कुंजीर), महाराष्ट्र शाहीर, (दिग्दर्शक केदार शिंदे), स ला ते स ला ना ते (दिग्दर्शक संतोष कोल्हे), जित्राब (दिग्दर्शक तानाजी गाडगे), गिरकी (दिग्दर्शक कविता दातीर, अमित सोनावणे), गाभ (दिग्दर्शक अनुप जत्राटकर), टेरिटरी (दिग्दर्शक सचिन श्रीराम), मदार (दिग्दर्शक मंगेश बदार) या ९ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Back to top button