मित्राशी चॅटिंगचा पुरावा; पत्नीचा पोटगीचा दावा फेटाळला | पुढारी

मित्राशी चॅटिंगचा पुरावा; पत्नीचा पोटगीचा दावा फेटाळला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पत्नीने पोटगीची मागणी करताच तीन महिने संसार चालविणार्‍या पत्नीने मित्राशी केलेल्या चॅटिंगचे पुरावे पतीने न्यायालयापुढे सादर केले. पतीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत पत्नीने मागितलेला पोटगीचा दावा लष्कर न्यायालयाचे सहप्रथवर्ग न्यायदंडाधिकारी चं. ना. ओडरे यांनी फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पतीला दिलासा मिळाला आहे. माधव व माधवी (नावे बदललेली आहेत) दोघेही उच्चशिक्षित. त्यांचा विवाह 2016 रोजी झाला. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. लग्नानंतर जेमतेम तीनच महिने दोघांचा संसार चालला. त्यानंतर माधवी माहेरी निघून गेली. त्यानंतर 2018 मध्ये तिने पतीविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला.

यादरम्यान, पतीने शारीरिक व मानसिक छळ करून घरातून हाकलून दिल्याचे आरोप केले. पतीतर्फे अ‍ॅड. जयकुमार कदम यांनी न्यायालयात कामकाज पाहिले. पत्नीने पतीविरोधात केलेल्या आरोपांचे खंडन करत माधवी ही माधवकडे तीन महिने कालावधीत राहायला असताना कोणतेही वैवाहिक संबंध तिने ठेवले नाहीत. यादरम्यान, माधवने कोणतेही शारीरिक अथवा मानसिक छळ केला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, माधवी हिने तिच्या मित्राशी व्हॉट्सअप चॅटिंग केल्याचे पुरावे सादर केले. भारतीय पुरावा कायदा कलम 65 ब चे प्रमाणपत्र देऊन सादर केलेले व्हॉट्सअप चॅटिंग पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरत पत्नीचा पोटगीचा दावा फेटाळला.

हेही वाचा :

Back to top button