हिंगोली : जवळाबाजार येथे आगीत ३ दुकाने जळून खाक | पुढारी

हिंगोली : जवळाबाजार येथे आगीत ३ दुकाने जळून खाक

जवळाबाजार : पुढारी वृत्‍तसेवा  परभणी मार्गावर मुनीर पटेल यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. या दुर्घटणेत जवळपास ‘तीन दुकान जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणल्‍यामुळे या शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये असलेला बाकीच्या दुकानांचे नुकसान टळले.

७ मे रोजी जवळाबाजार ते परभणी मार्गावर मुनीर पाटील याचे पत्राचे शेड तयार करून शॉपींग कॉम्प्लेक्स बनवले आहे. या शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास सर्व दुकान बंद अचानक एका दुकानातून आगीचे लोट बाहेर पडू लागले. यामुळे बाजुच्या दुकानांमध्येही आग लागली. यावेळी वार्‍याचा वेगही अधिक असल्‍याने आगीने रौद्र रूप धारण केले. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. नंतर दोन अग्निशामक बंबांच्या साहाय्याने तसेच नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

जर आग आटोक्यात आली नसती तर फार मोठे नुकसान झाले असते. प्रसंगावधान राखत बाजुच्या दुकानातून माल बाहेर काढण्यात आला. यानंतर आग आटोक्यात आली. या आगी मध्ये नंदीनी एंटरप्राईजेस, राधाकृष्ण हेअर सलून, श्रावण कुशन मेकर, राधिका फायनान्स ही चार दुकाने आगीच्या भक्षस्‍थानी पडली. दरम्‍यान यावेळी बाजुच्या दुकानातील माल बाहेर काढल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे मुख्य कारण कळाले नसून, दुपार पर्यंत सदर पंचनामा झालेला नव्हता. घटनास्थळी पोलीस सहाय्यक निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव, जमादार राजेश ठाकुर, सचिन सांगळे, राम गडदे पोलीस कर्मचारीवर्ग उपस्थितीत होते.

हेही वाचा : 

Back to top button