४३ वर्षांच्या किम कर्दाशियनला Met Galaमध्ये पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, व्हिडिओ पाहाच! | पुढारी

४३ वर्षांच्या किम कर्दाशियनला Met Galaमध्ये पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, व्हिडिओ पाहाच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरबपती मॉडल किम कर्दाशियनने मट गाला २०२४ च्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. अनेक एकापेक्षा एक अनेक हॉलिवूड तारकांना या सोहळ्यात पाहण्यात आले. हॉलिवूडची प्रसिद्ध टीव्ही स्टार आणि बिझनेस वूमन किम कर्दाशियनने पुन्हा एकदा मेट गालामध्ये सर्वांनाच धक्का बसला. तिचा आऊटफिट तर कमालीचा होताच शिवाय तिचे बदललेले बाह्य व्यक्तिमत्व पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. रेड कार्पेटवर तिने Maison Margiela Couture चे कस्टम गाऊन परिधान केला होता. कंबर पातळ दिसण्यासाठी कॉर्सेट आणि शियर स्कर्ट परिधान केला होता. त्यावर तिने ग्रे कलरचा सिंपल स्वेटर परिधान केला होता. किम ४३ वर्षांची आहे. या वयात देखील इतकी सुंदर दिसत होती की, फॅन्सची नजर तिच्यावरून हटेना. (Kim Kardashian)

तिने इतका घट्ट ड्रेस परिधान केला होता की, पाहणाऱ्यांना वाटत होतं की, या ड्रेसमध्ये श्वास सुद्धा घेता येत नसेल. तिच्या व्हायरल व्हिडिओ एका युजरने म्हटले की, मला असं वाटतं की, कुणी तरी किमची मुलाखत घ्यावी, म्हणजे मला ती एक लाईन बोलण्यासाठी श्वास घेताना पाहू शकेन.

दुसऱ्या युजरने लिहिलं -त्याला पाहून असं वाटत आहे की, तिला श्वास घेता येत नाही. आणखी एकाने लिहिलं- तिला पाहून असे वाटत आहे की, किम वेदनेत आहे. तिसऱ्या युजरने लिहिलं-ती कार्टून पात्रासारखी दिसतेय. चौथ्या युजरने लिहिलं- तिने एकदा वेट ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे तिला वॉशरुमला देखील जाता आलं नव्हतं.

Back to top button