Shiv Shakti Parikrama Yatra : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्री खंडोबा देवाचे घेतले दर्शन | पुढारी

Shiv Shakti Parikrama Yatra : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्री खंडोबा देवाचे घेतले दर्शन

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिवशक्ती परिक्रमा अंतर्गत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर जावून महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. खंडोबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कुलधर्म- कुलाचारानुसार तळी भंडारचा विधी केला. श्री मार्तंड देवसंस्थानचे वतीने विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वास पानसे यांनी पंकजा मुंडे यांचा खंडोबा देवाचा फोटो, घोंगडी व घुंगर काठी देवून सन्मान केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटचा जयघोष करून जेजुरी येथील शिवशक्ती परिक्रमा केली.

जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून महाराष्ट्रात लग्न झाल्यानंतर नव दाम्पत्य देवाला दर्शनासाठी येत असतात. आजही भंडाराच्या उधळणीमुळे येथे देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय येतो. सध्या शासनाच्या वतीने पुरातत्व खात्याच्या वतीने मंदिराचे काम सुरू आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे बाबाराजे जाधवराव, श्रीकांत ताम्हाणे, सचिन पेशवे, अलका शिंदे, गणेश भोसले, सचिन लांबते, साकेत जगताप तसेच हेमंत सोनवणे, पंकज नीकुडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Kashedi Tunnel : हलक्या वाहनांसाठी कशेडी बोगदा सोमवार पासून खुला होणार 

Talathi Exam : आंदोलन, बंदमुळे तलाठी परीक्षा रद्द होणार नाहीत

Dr. Narendra Dabholkar : सीबीआयच्या अधिकार्‍यांची उलटतपासणी पूर्ण

Back to top button