Dr. Narendra Dabholkar : सीबीआयच्या अधिकार्‍यांची उलटतपासणी पूर्ण | पुढारी

Dr. Narendra Dabholkar : सीबीआयच्या अधिकार्‍यांची उलटतपासणी पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. या प्रकरणात आणखी काही साक्षीदार घेतले जाणार आहेत की नाही, हे सीबीआय न्यायालयाला सांगणार असून, आतापर्यंत कशा पद्धतीने तपास करण्यात आला, याचा अंतिम अहवाल 13 सप्टेंबरला सीबीआयकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे, अशी माहिती सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात सीबीआयच्या वतीने 20 साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. यामध्ये किरण केशव कांबळे आणि विनय केळकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससूनच्या शवविच्छेदन विभागाचे डॉ. अजय तावरे, फिर्यादी नवनाथ रानगट, संजय साडविलकर, सोमनाथ धायडे आणि एस. आर. सिंग यांची साक्ष नोंदविण्यात आली.

सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. आता अजून काही साक्षीदार न्यायालयात सादर करायचे असल्यास सीबीआयला त्याची यादी न्यायालयात सादर करावी लागणार आहे. आणखी काही साक्षीदार घेणार आहे का? घेणार असेल तर त्याविषयीची यादी सीबीआय न्यायालयात 13 सप्टेंबरला सादर करणार आहे.

हेही वाचा

कराडमध्ये 200 गावे करणार चक्री उपोषण

पुणे : समाविष्ट गावांमधील मालमत्ता विक्रीचा मनस्ताप

कोल्हापुरात उद्यापासून 20 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश

Back to top button