पिंपरी : एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक | पुढारी

पिंपरी : एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक

पिंपरी(पुणे) : एटीएम कार्डची अदलाबदल करीत पैसे काढल्याचा दोन घटना भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. मंगळवारी (दि. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये दोन्ही घटना घडल्या.
नंदकुमार रामचंद्र पाटील (55, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी पाटील येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये गेले. त्यावेळी दोन अनोळखी तरुण पैसे काढत होते. दरम्यान, शेजारी असलेल्या मशीन मधून फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे मशीन मधून बाहेर आले नाहीत. त्यावेळी एका तरुणाने मफसीसीटीव्ही मध्ये बघून पिन नंबर टाका, म्हणजे तुमचे पैसे बाहेर येतील, असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बघून पिन नंबर टाकला. मात्र, तरी देखील त्यांचे पैसे मशीन मधून बाहेर आले नाही.

फिर्यादी यांना पत्नीचा फोन आल्याने एटीएम कार्ड घेऊन ते निघून गेले. दरम्यान, सराफाच्या दुकानात सोने खरेदी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, खिशात असलेले एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीचे आहे. काही वेळानंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर बँक खात्यातून काही रक्कम काढल्याचा मेसेज आला. फिर्यादी यांनी एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी बँकेत धाव घेतली. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, त्यांच्या खात्यातून 80 हजार रुपये काढण्यात आले आहेत. त्यानंतर फिर्यादी तक्रार करण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी सचिन प्रभाकर खंडागळे यांची देखील अशाच प्रकारे एटीएम कार्डची अदलाबदल करून 35 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. .

 हेही वाचा

जागतिक हिपॅटायटीस दिन : हिपॅटायटीस आजाराविषयी जागरूकतेचा अभाव

चार वर्षांत ‘हिपॅटायटीस बी’चे दोन हजारांहून अधिक रुग्ण

पुणे : रखडलेल्या प्रकल्पांबाबत रेरातील बदल स्वागतार्ह

Back to top button