एनएसयूआय अध्यक्षाकडून विनयभंग! | पुढारी

एनएसयूआय अध्यक्षाकडून विनयभंग!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीची विद्यार्थी संघटना म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या संघटनेच्या अध्यक्षाने विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान तरुणीने समाजमाध्यमातून पोलिस आणि विद्यापीठ प्रशासनाला माझं बाहेर पडणंही मुश्किल झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणी संघटनेचा अक्षय कांबळे याच्याविरोधात चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एनएसयूआय अध्यक्ष अक्षय कांबळे याने विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलिस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातील पीडित मुलीने या संदर्भात कोणालाही माहिती दिली नव्हती. मात्र मेसेज आणि त्रास वाढतच गेल्याने अखेर सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.

माझं जगणं मुश्कील केलं; कारवाई करावी

अक्षय मला दोन महिन्यापासून नाहक त्रास देत आहे. मला टॉर्चर करत आहे. त्याने माझं विद्यापीठातील जगणं मुश्किल केलं आहे. त्यामुळे मी वसतिगृहाच्या बाहेर पडत नाही. त्याने माझे वसतिगृहाच्या बाहेर पडणं देखील मुश्कील केलं आहे. बाहेर पडल्यावर मला त्याची भीती जाणवत असते. त्याने आपल्या संघटनेचे गुंड आणून मला धमकावण्याचा प्रकार केला. त्यामुळे मला अजून भीती वाटत आहे. विद्यापीठ आणि पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी. त्याने माझं जगणं मुश्किल केलं आहे. मला प्रचंड मानसिक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने देखील अक्षय कांबळे याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीने केली आहे.

हेही वाचा

Back to top button