Monsoon Update | ‘मान्सून’साठी पोषक वातावरण, लवकरच केरळमध्ये धडकणार

Monsoon Update
Monsoon Update
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून ( Monsoon Update) दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने X अकाऊंवरून दिले आहे.

मान्सून 'या' तारखेला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. परंतु नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता यापूर्वी वर्तवली होती. यानुसार शुक्रवार ३१ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन (Monsoon 2024 Update) होणार असल्याची शक्यता यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती.

Monsoon 2024 Update : मान्सूनची ठळक वैशिष्ट्ये

  • मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो.
  • यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये
  • १५ जुलै पर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो.
  • यंदा देशात मान्सून दमदार बरसणार . सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज.
  • येत्या मान्सून हंगामात 'ला निना' परतणार, पाऊस धो-धो बरसणार.

परंतु, मान्सून बंगालच्या उपसागराच्या शाखेने पोहचेल?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'रेमल' महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा पुढे गेला असून, रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळून ते सोमवारी 27 रोजी ते बांगलादेशकडे जाईल. दरम्यान, या स्थितीमुळे मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय झाली असून, तो नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यावर पोहोचला. त्यामुळे यंदाही तो केरळऐवजी बंगालच्या उपसागराच्या शाखेने भारतात येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याचा अंदाज चक्रीवादळ शांत झाल्यावरच अधिक स्पष्टपणे देता येईल.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news