तुम्‍ही चार वर्ष झोपला होता का? : गेम झोन अग्‍निकांडप्रकरणी हायकोर्टाने अधिकार्‍यांना फटकारले

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुम्‍ही गेली चार वर्ष झोपला होता का, आमचा आता सरकावर विश्‍वास राहिला नाही, अशा शब्‍दांमध्‍ये राजकोट गेम झोन अग्‍निकांडप्रकरणी गुजरात उच्‍च न्‍यायालयाने अधिकार्‍यांना फटकारले. राजकोटमधील गेमिंग झोनमध्‍ये शनिवारी रात्री आगीत १२ मुलांसह ३३ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल (suo motu) घेतली होती.
राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग मानवनिर्मित आपत्ती

राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग मानवनिर्मित आपत्ती

गेम झोन अग्‍निकांडाप्रकरणी न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवन देसाई यांचा खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, "राजकोट गेम झोमध्‍ये लागलेली आग ही एक मानवनिर्मित आपत्ती आहे. यामध्‍ये लहान मुलांचे निष्पाप जीव गमावले गेले आहेत. अशा करमणुकीच्या सुविधा सक्षम अधिकाऱ्यांकडून पुरेशा मंजूरीशिवाय अस्तित्वात आल्या होत्‍या."

राजकोट अग्‍निकांडातील मृतांची संख्‍या ३३ वर

गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रस्त्यावरील टीआरपी मॉलमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली हाेती. या भीषण दुर्घटनेत 12 लहान मुलांसह ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी 'डीएनए' टेस्ट केली जाणार आहे. गेम झोन पूर्णपणे जळून खाक झाला आहे. गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लाय व लाकडाचे तुकडे पसरलेले होते. उपस्थित कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. अवघ्या 30 सेकंदांत आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news