चार वर्षांत ‘हिपॅटायटीस बी’चे दोन हजारांहून अधिक रुग्ण | पुढारी

चार वर्षांत ‘हिपॅटायटीस बी’चे दोन हजारांहून अधिक रुग्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या चार वर्षांमध्ये ‘हिपॅटायटीस बी’ आजाराच्या 2138 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ‘हिपॅटायटीस सी’च्या 1260 रुग्णांपैकी 1154 रुग्णांवरील उपचार पूर्ण केले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
‘हिपॅटायटास बी’ आणि ‘सी’ या आजारांवर नियंत्रण अणि प्रतिबंधासाठी केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये उपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये हिपॅटायटीसची मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करीन देण्यात आले आहेत.

‘हिपॅटायटीस बी’च्या रुग्णांना आयुष्यभर उपचारांची गरज असते आणि ‘हिपॅटायटीस सी’ आजाराचा रुग्ण तीन महिन्यांच्या उपचारांनंतर बरा होतो. शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व गर्भवती महिलांची ‘हिपॅटायटीस बी’ची तपासणी करण्यात येते. महिला पॉझिटिव्ह आढळल्यास मातेच्या बाळास तत्काळ एचबीआयजी इंजेक्शन देण्यात येते. 2019 ते जून 2023 पर्यंत साधारणपणे 2200 नवजात बालकांना इंजेक्शन देण्यात आले आहे.

उपचार केंद्रात कोणाची तपासणी?
एचआयव्हीबाधित रुग्ण
अतिजोखमीचा वर्ग
थॅलेसमिया उपचारांसाठी नियमित रक्ताची गरज असणारे रुग्ण

डायलिसिस उपचार घेणारे रुग्ण
‘हिपॅटायटीस बी’ किंवा ‘सी’ पॉझिटिव्ह रक्तदाते
कारागृहांमधील कैदी

Back to top button