तळेगाव-चाकण रस्ता एमआयडीसी मार्गे होणार! | पुढारी

तळेगाव-चाकण रस्ता एमआयडीसी मार्गे होणार!

तळेगाव दाभाडे(पुणे) : तळेगाव एमआयडीसीमधील 45 मीटरचा तळेगाव-चाकण रस्ता एमआयडीसी मार्गे करण्याच्या मार्गातील अडथळा दूर होणार आहे, अशी माहिती उद्योजक रामदास काकडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्याच्या कामासाठी जमीन देणारे शेतकरी व जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी सचिन बारावकर, सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये टप्पा क्रमांक 1 ते 2 चाकण-तळेगाव रस्ता एमआयडीसी मार्गे जोडणे आणि टप्पा क्रमांक 1 ते 4 जनरल मोटर्स ते आंबळे एमआयडीसी रस्ता जोडण्याबाबत चर्चा झाली.

यामध्ये शासनाकडून प्रतिएकरी एक कोटी, चार लाख रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, शेतकर्‍यांनी प्रतिएकरी 2 कोटींची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दोन्ही प्रकरणे मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये पाठवून अर्जातील मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करू, असे सांगितले. शेतकर्‍यांना समाधानकारक दर मिळाला, तर त्वरित जमिनी देऊ, अशी हमी शेतकर्‍यांच्या वतीने उद्योजक रामदास काकडे यांनी दिली आहे.

हेही वाचा

हिंजवडी : कासारसाई धरण परिसरात सुरक्षेची वाणवा

महाराष्ट्रात बंदी, कर्नाटकात मात्र उपसा सुरूच; दूधगंगेवरील प्रकार

Ashadhi wari 2023 : महर्षी वाल्मीकी ऋषींच्या दोन पालखी सोहळ्यांचे होणार प्रस्थान

Back to top button