पुणे : सफाई कामगारासह चौघांच्या मृत्यूप्रकरणी घरमालक अटकेत | पुढारी

पुणे : सफाई कामगारासह चौघांच्या मृत्यूप्रकरणी घरमालक अटकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तीन सफाई कामगारांसह चौघांच्या मृत्यूला जबाबदार धरून संबंधित घरमालक भीमाजी जयसिंग काळभोर (वय. 37, रा. सिद्रामळा लोणीकाळभोर) याला अटक केली आहे. याप्रकरणी, राजनंदीनी वाघमारे (वय. 26, रा. पठारेवस्ती कदमवाकवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळभोर याच्या विरुद्ध भादवि कलम 304 (अ), सह ‘प्रोव्हीबिशन ऑफ एम्प्लायमेंट अँड मॅन्युअल स्कॅव्हेजर अ‍ॅण्ड रिहॅबिलेशन अ‍ॅक्ट 2013’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

War Refugees : सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

ही घटना लोणीकाळभोरमध्ये बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास काळभोर याच्या जयमल्हार बिल्डिंगच्या सेफ्टी टँकमधील मैला व सांडपाणी साफ करताना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळभोर याने त्याच्या इमारतीच्या सेफ्टी टँकमधील मैला व सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी कामगार सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे, कृष्णा दत्ता जाधव व रुपचंद नवनाथ कांबळे या तिघांना उतरविले होते. यावेळी त्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची साधने पुरविण्यात आली नाहीत. तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून न देता, संबंधीत कामात निष्णात असणार्‍या कामगारांकडून हे काम करून घेणे गरजेचे होते.

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

यासर्व बाबींकडे दुर्लक्ष करून तिघांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना शौचालयाच्या टाकीत उतरविले. त्यामध्ये तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर काळभोर याने फिर्यादी महिलेचे पती पद्माकर वाघमारे यांना कामगार टाकीत पडले असल्याचे सांगून उठवून नेले. वाघमारे यांचा या कामाशी काही संबध नसताना त्यांना जबरदस्तीने टाकीत उतरण्यास भाग पाडले. त्यामध्ये वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाघमारे हे एका खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. पुढील तपास पोलिस उपिरीक्षक शेंडगे करीत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी : युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्‍यासाठी रशिया चर्चेस तयार

जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र लावणे बंधनकारक

Winter Paralympics 2022 : आता रशिया सोबत बेलारुसला दणका, बिजिंग पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंवर घातली बंदी

Back to top button