Amit Shah fake video case: अमित शहा डीपफेक व्हिडिओ प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने कारवाईची मागणी करणारी याचिका फेटाळली | पुढारी

Amit Shah fake video case: अमित शहा डीपफेक व्हिडिओ प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने कारवाईची मागणी करणारी याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान देशाचे गृमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यावरील डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. याची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयात व्हिडिओ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आज (दि.२ मे) सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. (Amit Shah fake video case)

दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक काळात कारवाईचे आदेश देता येत नाहीत. न्यायालय निवडणुकीच्या मध्यभागी दिशा देऊ शकत नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय भारतीय निवडणूक आयोग घेईल, त्याच्यावर आमचा विश्वास आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने चालू लोकसभा निवडणुकीदरम्यान डीपफेक व्हिडिओंच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जनहित याचिका निकाली काढली आहे.(Amit Shah fake video case)

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीपफेक व्हिडीओच्या प्रसाराविरोधात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी वकिलांच्या संघटनेच्या प्रतिनिधित्वासाठी सोमवार ६ मे पर्यंत निर्णय घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला सांगितले आहे. (Amit Shah fake video case)

संबंधित बातम्या

हेही वाचा:

Back to top button