मोठी बातमी : युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्‍यासाठी रशिया चर्चेस तयार

मोठी बातमी : युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्‍यासाठी रशिया चर्चेस तयार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
रशिया -युक्रेन युद्धाच्‍या आज आठवा दिवशी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्‍यासाठी चर्चेस तयार असल्‍याची घोषणा रशियाचे परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांनी केली आहे.

  • Winter Paralympics 2022 : आता रशिया सोबत बेलारुसला दणका, बिजिंग पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंवर घातली बंदी

सर्गेई लावरोव यांनी म्‍हटलं आहे की, या युद्धात आम्‍ही अणवस्त्राचा वापरची धमकी कधीच दिली नाही. पाश्‍चात्‍य देशांच सुरुवातील अणवस्त्र वापराचा इशारा दिला आहे. आम्‍ही आमच्‍या मागण्‍या युक्रेनकडे दिल्‍या आहेत. आता आम्‍हाला युक्रेनच्‍या उत्तराची प्रतीक्षा आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

सलग आठव्या दिवशी रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरुच आहे. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन या महत्वाच्या शहरावर ताबा मिळवला असल्याचे वृत्त आहे. रशियन सैन्याने दक्षिणेकडील युक्रेनच्या खेरसन शहरात धडक दिली असून त्यांनी कौन्सिलच्या इमारतीत प्रवेश केला आहे. या वृत्ताला खेरसन शहराच्या महापौरांनी पुष्टी दिली आहे.

रशियन सैन्याला युक्रेनमधील सरकारला उलथवून टाकणे अद्याप शक्य झालेले नाही. पण त्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सकाळी सांगितले होते की, त्यांनी खेरसनवर ताबा मिळवला आहे. परंतु काही तासांनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने युक्रेन सैन्य या ठिकाणी तीव्र प्रतिकार करत असल्याचे म्हटले होते.

दक्षिण प्रांताची राजधानी असलेल्या खेरसन शहराची लोकसंख्या सुमारे अडीच लाख आहे. येथील निप्रो नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते. हे महत्वाचे शहर आता रशियाच्या ताब्यात गेले आहे. दरम्यान, बुधवारी उशिरा खेरसनचे महापौर इगोर कोलीखायेव यांनी, रशियन सैन्य शहरातील रस्त्यावर असल्याची माहिती दिली होती. रशियाने युक्रेनमधील त्यांच्या कारवाईला विशेष ऑपरेशन म्हटले आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील कीव्हसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. १५ लाख लोकसंख्येच्या खार्कोव्ह शहरात बॉम्बस्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

युक्रेनमधील सर्वसामान्‍य नागरिकाचे जीवन पूर्णत: उद्‍ध्‍वस्‍त झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात युक्रेनमधील १० लाख लोकांवर निर्वासित होण्याची वेळ आलेली आहे. सातत्याने होत असलेल्या बाँब वर्षावात अनेक लोकांनी आपली घरे सोडली असून ते सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यासाठी धडपडत आहेत. या शतकात कमी कलावधीमधील एका देशांतून नागरिक निर्वासित होण्‍याचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे, असे संयुक्‍त राष्‍ट्राने ( युनो) म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news