War Refugees : सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित | पुढारी

War Refugees : सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

कीव्‍ह : पुढारी ऑनलाईन
२४ फेब्रुवारी २०२२ हा दिवस युक्रेनसाठी काळा दिन ठरला. याच दिवशी रशियाने तुलनेने चिमुकल्‍या युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. याला सात दिवस पूर्ण झाले आहेत. या युक्रेनमधील सर्वसामान्‍य नागरिकाचे जीवन पूर्णत: उद्‍ध्‍वस्‍त झालय.  रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात युक्रेनमधील १० लाख लोकांवर निर्वासित होण्याची वेळ आलेली आहे. सातत्याने होत असलेल्या बाँब वर्षावात अनेक लोकांनी आपली घरे सोडली असून ते सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यासाठी धडपडत आहेत.  या शतकात  कमी कलावधीमध्ए‍ये का देशांतून नागरिक निर्वासित होण्‍याचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे, असे संयुक्‍त राष्‍ट्राने ( युनो) म्‍हटलं आहे. ( War Refugees )

War Refugees : २ टक्‍के नागरिकांनी केले शेजारील देशांमध्‍ये स्‍थलांतर

संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेमध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले की, युक्रेनच्‍या एकुण लोकसंख्‍येच्‍या २ टक्‍के लोकांनी
स्‍थलांतर केले आहे. मागील सात दिवसांमध्‍ये लाखोंच्‍या संख्‍येने नागरिक आपला देश सोडत आहेत. युद्ध सुरु झाल्‍यानंतर असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आल होता की, युक्रेनमधील जास्‍तीत जास्‍त ४ लाख नागरिक देश सोडतील. पण ज्‍या वेगाने नागरिक देश सोडत आहेत. यावरुन हा आकडा आणखी वाढणार हे स्‍पष्‍ट होत आहे.

‘युएनएचसीआर’च्‍या प्रवक्‍त्‍या जोंग-अह-घेदिनी-विलियम्‍स यांनी यासंदर्भात असोसिएट प्रेसला ई-मेलव्‍दारे माहिती दिली आहे. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, आमच्‍याकडे असलेल्‍या माहितीनुसार आतापर्यंत युक्रेनमधील १० लाखांहून अधिक नागरिक हे शेजारच्‍या देशांमध्‍ये स्‍थलांतरीत झाले आहेत.

War Refugees : निवार्सिताचा वेग असाच राहिला तर….

२०११मध्‍ये युद्धामुळे सुरु झाल्‍यानंतर पहिल्‍याच दिवशी युक्रेनमधून ८२ हजार नागरिक स्‍थलांतरीत झाले होते. २०११ मध्‍ये सिरीयातून सुमारे ५० लाखांहून अधिक नागरिकांनी स्‍थलांतर केले होते. यानंतर २०१३मध्‍ये सिरीयातून तीन महिन्‍यांमध्‍ये १० लाख नागरिक निर्वासित झाले होते. मात्र युक्रेनमधून केवळ सात दिवसांमध्‍ये १० लाखांहून अधिक नागरिक स्‍थलांतरीत झाले आहेत. हा वेग पाहता या देशातून या शतकातील सर्वाधिक स्‍थलांतर हे युक्रेनमधून होईल, अशी भीती ‘युएनएचसीआर’कडून व्‍यक्‍त होत आहे.

निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्त फिलिपो ग्रांडी यांनी आतापर्यंत १० लाख लोकांनी युक्रेन सोडले असल्याचे म्हटलेले आहे. “युद्ध तातडीने थांबले पाहिजे, जेणे करून आम्ही मदत कार्य सुरू करू शकू,” असे ते म्हणाले आहेत. हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया अशा देशांत या निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. लहान मुलांसह नागरिक पोलंड गाठत आहेत. पण अनेक मुलांचे वडील युद्धात सैन्याला मदत करण्यासाठी युक्रेनमध्ये थांबले आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.

रशियाकडून ३ शाळांवर बाँबहल्ले

युक्रेन खारकिव या शहराचा बचाव करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना रशियाने तेथील ३ शाळांवर बाँबहल्ले केले आहेत.रशियाच्या सैन्याकडून जे युद्ध गुन्हे होत आहेत, त्याची तातडीने चौकशी आणि तपास सुरू केला असल्याचे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने म्हटलेले आहे. कोर्टाच्या अखत्यारित येतील असे युद्ध गुन्हे घडत असल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे, असे कोर्टाने स्‍पष्‍ट केले आहे. तर रशियाने युद्ध गुन्हे घडले नसल्याचे म्हटलेले आहे.

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फिल्ड यांनी रशिया बंदी असलेल्या घातक शस्त्रांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. जिनिव्हा करारानुसार बंदी घातलेल्या व्हॉक्युम बाँबचा वापर ही केला जात आहे, असे त्यांनी म्हटलेले आहे. एकूणच या हल्ल्यामुळे फार मोठे मानवी संकट उभे राहाणार आहे, अशी भीती या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.आतापर्यंत किती नागरिकांचा या युद्धात मृत्यू झाला हे निश्चित सांगता येत नसले तरी युनायटेड नेशन्स ह्युमन राईट मिशनने ७५० नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button