अपहरणप्रकरणी पोलिसासह आठ जणांना अटक | पुढारी

अपहरणप्रकरणी पोलिसासह आठ जणांना अटक

वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सी असल्याच्या संशयावरून पोलिसाने साथीदारांच्या मदतीने एकाचे अपहरण केले. त्यानंतर बिट कॉइन आणि आठ लाखांची मागणी केली. मात्र, वाकड पोलिसांनी आठ जणांना अटक करीत हा डाव उधळून लावला.

पोलिस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, मूळ रा. कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) याच्यासह सुनील राम शिंदे (रा. खारदांडा, पश्चिम, मुंबई), वसंत शामराव चव्हाण (रा. नालासोपारा पूर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण, ठाणे), मयूर महेंद्र शिर्के (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदीप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

तर राज्यपालांचा नागरी सत्कार करू; संजय राऊतांचा खोचक टोला

आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे 14 जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय 38) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलातून सात ते आठ अनोळखी व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली.

नाथसागर जलाशयात मृतावस्थेत आढळली महाकाय गर्भवती मगर

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरू केले.

दरम्यान, पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडून पळ काढला. आरोपींनी आपल्याकडे बिट कॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार, वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आता होणार कमी

तेथून चौघांना ताब्यात घेत कार जप्त केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बंसल आणि शिरीष खोत यांच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले.

खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले.

मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

खंदारे याने त्याच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे आदींच्या पथकाने केली.

पोलिस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पूर्वी पुणे शहर पोलिस दलात कार्यरत होता. तेथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अ‍ॅडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसीक ऑफ हार्डवेअर अ‍ॅण्ड नेटवर्क इंन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सीक असे कोर्स केले आहेत.

३ कोटी गरीब लोकांना पक्की घरे देऊन लखपती बनवले : पंतप्रधान मोदी

तसेच, सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण 300 कोटी रुपयांची बिट कॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली.

 

Back to top button