नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार संजय राऊत मानले तर, विधानपरिषदेच्या १२ जागांचा निर्णय घेतल्यास त्यांचा नागरी सत्कार करू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिली. मुंबईवर घाला घालण्याचे कारस्थान सुरु असल्याचे सांगत केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर असताना मुंबईला ओरबडण्याच्या जेवढा प्रयत्न झाला नाही तेवढा प्रयत्न भाजपच्या कार्यकाळात सुरू आहे अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबईची धुळधाण करणे, प्रकल्प,उद्योग-धंदे पळविण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईला कमी समजणे, महत्व कमी करणे अशा बाबी सुरु आहेत. सव्वा कोटी मुंबई देते, राष्ट्रहितासाठी आम्ही त्याग केला. आमची पाकीटमारी करून आमच्यावर दादागिरी केली जात आहे. मुंबईवर सातत्याने अन्याय करायचा. मुंबईला शिवसेनेपासून हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार जे चालवितात त्या उद्योगपतींसाठी हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांसाठी करामध्ये कधीच सवलत मिळत नाही, अशी प्रतिक्रिया ही राऊत यांनी दिली.
तसेच, उत्तर प्रदेशातील ६० जागांवर शिवसेना निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या ९ प्रमुख उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयोगानेदेखील आमचे ऐकले नाही. हा लोकशाहीसाठी घातक प्रकार आहे. आमच्या ५० ते ६० उमेदवारांची त्यांना भीती वाटते. उत्पल पर्रिकरयांची लढाई भाजपविरोधात असून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आयाराम गयाराम उमदेवारांचा पराभव पणजीच्या जनतेने करावा,असे आवाहन राऊत यांनी केले.
हे ही वाचलं का