वेदनादायी..! कुत्र्याच पिल्‍लू गमावलं,१२ वर्षांच्‍या मुलीने जीवन संपवलं! | पुढारी

वेदनादायी..! कुत्र्याच पिल्‍लू गमावलं,१२ वर्षांच्‍या मुलीने जीवन संपवलं!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाळीव प्राणी मग कुत्रा असो की, मांजर तो कुटुंबातील सदस्‍यच होतो. लहान मुलांप्रमाणे कुटुंबातील सारेच सदस्‍य त्‍याच्‍यावर जीव लावतात. मात्र अशा प्रकारचा जिल्‍हाळा एका १२ वर्षांच्‍या मुलीच्‍या जीवावर बेतला. कुत्र्याच पिल्‍लूचा मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या आठवणीत तिने आपलं जीवन संपवलं. हरियाणातील या धक्‍कादायक घटनेने पालकांसह श्‍वानप्रेमी हादरले आहेत.

या प्रकरणी मुलीच्‍या कुटुंबीयांनी दिलेल्‍या महितीनुसार, तीन महिन्‍यापूर्वी कुत्र्याच पिल्‍लू घरी आणलं. गेल्या ३ महिन्यांपासून हे पिल्लू कुटुंबातील एक सदस्‍य झालं होतं. पाच दिवसांपूर्वी त्‍याचा मृत्‍यू झाला. कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्‍का बसला. इयत्ता सहावीची विद्यार्थिनीला पिल्लू गमावल्याचे दुःख असह्य वाटत होते.

कुत्र्याच पिल्‍लाचा मृत्‍यू झाल्‍यानंतर १२ वर्षीय मुलीने खाणे सोडले. ती प्रचंड व्‍यथित होती. उदासीनतेची चिन्हे दर्शवित होती. कुटुंबीयांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तरीही, कुत्र्याच पिल्लू गमावल्याचे दुःख तिला असह्य वाटत होते. ती प्रचंड तणावात होती. तिने गळपास लावून घेवून जीवन संपवले, असे असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

शनिवारी सायंकाळी मुलीच्‍या आई आणि बहीण घरगुती कामानिमित्त बाहेर गेल्‍या. घरी एकटी 12 वर्षांच्या मलीने गळपास लावून घेत जीवन संपवले. मुलीचे तिच्या पाळीव प्राण्याबद्दलचे प्रेम प्रगल्भ होते. त्‍याच्‍या मृत्‍यूचा तिला मोठा मानसिक धक्‍का बसला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पिल्लू घरातील प्रत्‍येकाचे लाडक झालं होतं. अखेर आई आणि बहिण बाहेर गेल्‍याचे पाहून मुलीने गळफास लावून घेत जीवन संपवल्‍याचे तिच्‍या आईने सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button