नाशिक : मोबाइल वापरण्याचा बहाणा, वृद्धास सव्वा लाखांचा गंडा | पुढारी

नाशिक : मोबाइल वापरण्याचा बहाणा, वृद्धास सव्वा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मोबाइल वापरण्याच्या बहाण्याने एकाने वृद्ध नातलगाच्या फोन पे अ‍ॅपवरून मित्राच्या खात्यात सव्वा लाख रुपये वर्ग करून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन बाबूलाल तांबट (68, रा. रामवाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 2 जुलै ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत त्यांच्या साडूच्या मुलाने हा गंडा घातला. संशयित अक्षय केशव कासार (रा. हुडको कॉलनी, भुसावळ) हा नितीन तांबट यांना भेटण्याच्या बहाण्याने वेळोवेळी घरी आला होता.

मित्राला फोन करायचा असल्याचे सांगून अक्षयने तांबट याच्या मोबाइलचा वापर केला. फोन करण्याच्या बहाण्याने अक्षयने फोन पेवरून तांबट यांच्या बँक खात्यातील एक लाख 25 हजार रुपये त्याचा मित्र मिलिंद गौतम सोनवणे याच्या बँक खात्यात वर्ग केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नितीन तांबट यांनी चौकशी केली. त्यानंतर अक्षयविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात चेन स्नॅचिंग, घरफोडी आदींसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button