

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आनंदाचा शिधा वाटपाची सरकारी किंमत शंभर रुपये असताना, स्वस्त धान्य दुकानदराने एकशे तीस रुपये घेऊन वाटप केले आहे. याची चौकशी होऊन जादा घेतलेले पैसे परत मिळावेत व स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करावा. अन्यथा तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह, उपोषण करण्याचा इशारा तालुक्यातील पिरेवाडी, डमाळवाडी, आठरवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
पप्पू आमीन पठाण, भैय्या करीम पठाण यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत पिरेवाडी, डमाळवाडी, आठरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने दिवाळीचा शिधावाटप शंभर रूपयेप्रमाणे करण्याऐवजी गोरगरीब जनतेकडून एकशे तीस रूपये जास्त दराने वाटप केलेले आहे. बाकी धान्य गहू व तांदूळ याचे सुद्धा वाटप केलेले नाही. दर तीन महिन्यातून एकदा धान्याचे वाटप संबंधित दुकानदारांकडून केले जाते. दुकानदाराची त्यामुळे या दुकानदाराचा धान्य परवाना रद्द करावा. आनंदाचा शिधा वाटपामध्ये जादा घेतलेले तीस रुपये परत मिळावेत.
अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शामिर बापू पठाण, लतिफ पठाण, पप्पू पठाण, बुर्हान जमाल शेख, अजिनाथ कुटे, वामन गर्जे, अंबादास डमाळे, बालम अकमल पठाण, अजिनाथ आव्हाड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.